डाभुर्णीत गॅस सिलिंडर पेटल्याने संसारोपयोगी वस्तू जळून खाक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 
 
डांभुर्णी ता. यावल : 
 
येथून जवळच असलेल्या न्हावी प्र. अडावद (कोळन्हावी) येथील पंकज एकनाथ सोनवणे यांनी काल जळगाव येथील भारत गॅस एजन्सीकडून भरलेले सिलिंडर विकत घेतले व घरी आणून गॅस जोडणी केली.
 
त्यांच्या पत्नी सोनाली सोनवणे यांनी संध्याकाळी चहा व स्वयंपाक बनवण्यासाठी गॅस पेटवला असता रेग्युलेटरजवळ मोठ्या प्रमाणात सिलिंडरने पेट घेतला. रेग्युलेटर बंद करण्यासाठी महिलेने प्रयत्न केले असता आगीने रौद्ररूप धारण केले.
 
यात आस लागल्याने महिला आरडाओरडा करत घराबाहेर आली. वाड्यातील नागरिकांनी हिमतीने सिलिंडर विझवले. तेवढ्या वेळात घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
 
मोलमजुरी करून उभा केलेला संसार उद्ध्वस्त झाल्याने महिला आपली शुद्ध हरपली होती. घटनेची माहिती कळताच शिवसेनेचे युवाध्यक्ष तथा सरपंच पती गोटू सोळुंके यांनी भेट देऊन तलाठी बारेला व मंडलाधिकारी पी. ए. कडणोर यांना माहिती दिली.
 
मंडलाधिकार्‍यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. या घटनेत अंदाजे 90/95 हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा नोंदवण्यात आला आहे. कडणोर यांनी घटनास्थळी पाहणी करून एक हजार रुपयांची रोख स्वरुपात मदत केली.
 
 
भारत गॅसचे किशोर पाटील यांनी घटनेबाबत जळगाव येथे गॅस वितरकांना कळवले असता मॅकेनिकल म्हणून किशोर पाटील यांनी पाहणीदरम्यान सिलिंडरमध्ये (व्हॉल) नसल्याने स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त केला.
@@AUTHORINFO_V1@@