‘संस्कारभारती’तर्फे बहिणाबाईंची गाणी सादर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
बहिणाबाई चौधरींच्या पुण्यतिथी निमित्ताने आसोदा येथे बहिणाबाईंच्या अंगणात संस्कार भारती, जळगावच्या कला साधकांनी बहिणाबाईंची गाणी हा कार्यक्रम सादर केला.
 
यात नीलिमा चौधरी यांनी दोन कवितांचे वाचन केले. नंदिता बकोरे यांनी ‘अरे संसार संसार’ हे गीत सादर केेले. मृदुला कुळकर्णी यांनी ‘मन वढाय वढाय’ आणि ‘मानुस मानुस’ ही गीतं सादर केली.
 
आसावरी जोशी यांनी गुढीपाडव्याची कविता म्हटली तर स्मिता कासार यांनी घरोटा ही कविता म्हटली. श्रुती वैद्य हिने ‘माझी माय सरोस्वती’ आणि ‘धरतीच्या कुशीमंदी’ हे गीत सादर केले.
 
ज्योती पाटील ह्यांनी कार्यक्रमाचे निवेदन व ‘जीव देवान धाडला’ हे गीत व कविता सादर केली असून गिरीश मोघे यांनी हार्मोनियमची संगत तर नीळकंठ कासार यांनी तबल्यावर साथ दिली.
 
दिलीप चौधरी यांनी इतर तालवाद्यांची साथ केली. या कार्यक्रमास ग्रामस्थ उपस्थित होते तसेच किशोर सुर्वे (अध्यक्ष संस्कार भारती), तुषार वाघुळदे, प्रीती चौधरी, भागवत बर्‍हाटे, वर्षा बिर्‍हाडे, सुनंदा सुर्वे, हर्षदा कासार, दुष्यंत जोशी, चिंतामण पाटील, इंजि. भागवत पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते.
@@AUTHORINFO_V1@@