चाळीसगावात शिवाजी घाट, भाजीपाला मार्केट परिसरात रात्रीची घंटागाडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 
चाळीसगाव : 
 
शहरातील 1,4,7,8,11 या प्रभागांमध्ये एकूण 27 ठिकाणी कचरा वर्गीकरण प्रात्यक्षिके देण्यात आली व वर्गीकृत कचरा संकलन करून घेण्यात आला.
 
घरी जाऊन एकूण 178 भागधारकांची स्टीकरद्वारे जनजागृतीसाठी करून त्यांना स्वच्छ सर्वेक्षण 2019 बद्दल माहिती देण्यात आली. पालिकेने कचरा वर्गीकरण प्रात्यक्षिकांची जनजागृतीचा धडाका लावला असून मुख्य भाजीपाला मार्केट परिसरात रात्रीची घंटागाडी उपलब्ध करून दिल्याने नदीपात्राची अस्वच्छता थांबणार आहे.
 
शहरातील विविध भागात भाजीपाला विक्री करण्यासाठी हातगाड्या लावल्या जातात. यात प्रामुख्याने शिवाजी घाट, भडगाव रोड, स्टेशन रोडवरील नदी किनार्‍याला लागून असलेल्या रस्त्यावर फेरीवाले यांच्याकडून रात्रीचे वेळी कचरा गोळा करून नदीपात्रात व उघड्यावर टाकला जातो.
 
यासाठी सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत या भागात घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे हा कचरा लगेचच गोळा करून घेण्यात येत आहे. यामुळे या परिसरातील दुर्गंधी व होणारी घाण कमी होऊन परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. यावेळी नागरिक उपस्थित होते.
 
प्रत्येक वॉर्डातील नागरिकांना माहिती
 
प्रभाग क्र. 1,3,6,7,9 या प्रभागांमध्ये एकूण 27 ठिकाणी कचरा वर्गीकरण करून प्रात्यक्षिक देण्यात आले. भागधारकाकडून वर्गीकृत कचरा संकलित करून घेण्यात आला.
 
तसेच घरोघरी जाऊन एकूण 182 भागधारकांची स्टीकरद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच प्रभाग क्र. 4 येथे एम.जी. नगर याठिकाणी गटचर्चा घेण्यात आली, त्यात एकूण 25 भागधारक उपस्थित होते. प्रभाग 6 मधील नेताजी पालकर चौक येथील रेणुका माता मंदिर परिसरात लक्ष गट चर्चा घेण्यात आली.
 
त्यामध्ये एकूण 28 भागधारक उपस्थित होते. यावेळी आरोग्य निरीक्षक संजय गोयर यांचे सहसिटी समन्वयक व ग्रीनी टीम मेंबर्स उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@