SBI च्या ग्राहकांना करता येणार अमर्याद एटीएम वापर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने खुशखबर दिली आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकांना आता दरमहा अमर्यादित एटीएम सेवा वापरता येणार आहे. यापूर्वी दरमहा पाच ते सात मोफत एटीएम व्यवहार करण्याची मुभा होती मात्र यानंतर अधिकच्या व्यवहारावर बँकेकडून चार्ज आकाराला जायचा. मात्र आता अधिकच्या व्यवहारावर कोणताही चार्ज लागणार नसल्याची माहिती बँकेने दिली. त्यामुळे आता ग्राहकांना दरमहा अमर्यादित एटीएम व्यवहार करता येणार आहे. मात्र, यासाठी ग्राहकांच्या खात्यात किमान २५ हजारांची रक्कम असणे आवश्यक आहे.

 

दरमहा अमर्यादित एटीएम सेवा वापरता येणार असली तरी यावर बँकेने काही अटी घातल्या आहेत. दरमहा खात्यामध्ये २५ हजार रुपयांची किमान शिल्लक रक्कम असेल अशा ग्राहकांना दरमहा कोणत्याही एटीएमवर मोफत व्यवहार करता येणार आहेत. तसेच खात्यात किमान एक लाख रुपये शिल्लक रक्कम असेल त्यांना अमर्याद मोफत एटीएम व्यवहार करण्यात येणार आहेत. तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सॅलरी अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना कोणत्याही एटीएमवरून अमर्याद व्यवहार करता येणार असल्याची बँकेने माहिती दिली. त्यामुळे एटीएमचा अमर्याद वापर करायचा असल्यास तुमच्या खात्यावर किमान एक लाख रुपये असणे आवश्यक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@