महाराष्ट्रातील कुस्तीपटूंवर आली 'ही' वेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

 


 
 
अयोध्या : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अयोध्येला गेलेल्या महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना चक्क ट्रेनमधील शौचालयाजवळ बसून प्रवास करावा लागला. ही धक्कादायक घटना समोर आली आहे. अयोध्येवरून परतताना या कुस्तीपटूंना हा त्रास सहन करावा लागला. सर्व कुस्तीपटूंना अनारक्षित डब्यातून प्रवास कतरावा लागला. ट्रेनच्या या डब्यात बसायला जागा नसल्याने या कुस्तीपटूंना शौचालयाजवळ बसून २५ तासांचा प्रवास पार पाडावा लागला.
 

अयोध्येत झालेल्या या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील १० महिला आणि २० पुरुष पैलवानांचा संघ गेला होता. यापैकी ५ कुस्तीपटूंनी पदकही कमावले. परंतु अयोध्येहून परतीच्या रेल्वे प्रवासात या कुस्तीपटूंची साधी जागादेखील आरक्षित केली गेली नव्हती. २५ तासंचा हा त्रासदायक प्रवास कुस्तीपटूंना शौचालयाजवळ बसून करावा लागला. या प्रवासादरम्यानचे फोटो यातील काही कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कुस्तीपटूंना हा त्रास सहन करावा लागत असताना अयोध्येला गेलेली पदाधिकारी मंडळींनी मात्र परतीचा प्रवास विमानाने केला.

 

महाराष्ट्रातील हे कुस्तीपटू रविवारी दुपारी साडेतीन वाजता फैजाबाद येथून साकेत एक्सप्रेसने परतीच्या प्रवासाला निघाले होते. पावणे पाच वाजता ही एक्सप्रेस मनमाड येथे पोहोचली. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला पाच पदके मिळवून देणाऱ्या या कुस्तीपटूंवर अशी दुर्दैवी वेळ येणे. ही खूपच लांच्छनास्पद गोष्ट आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@