उज्ज्वला मोफत गॅस कनेक्शन घोटाळ्याची चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

 
चोपडा :
 
गॅस एजन्सीमार्फत उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत कनेक्शन वितरणात मोठा घोटाळा झाला असून लाभार्थींकडून पैसा घेऊन मोफत योजना राबविताना अपहार झाल्याच्या आरोपाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील व त्यांचे साथीदार सोमवारी तहसील कचेरी आवारात आमरण उपोषणास बसले होते.
 
तथापि खा. रक्षाताई खडसे व भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी जिल्हाधिकार्‍यांना लक्ष घालण्याचे आवाहन केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी 20 डिसेंबरपर्यंत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
 
जुलै महिन्यात भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी चोपडा तालुक्यात लाभार्थ्यांकडून बाराशे ते तेराशे रुपये घेऊन मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यात लूट करण्यात येत आहे.
 
तसेच योग्य लाभार्थ्यांना न देता फसवणूक केली जात असून चौकशीची मागणी केली होती. परंतु अद्यापही त्याबाबत कार्यवाही न झाल्याने त्यांनी आपल्या साथीदारांसह 3 रोजी तहसिल कचेरीवर उपोषण केले.
 
नितीन माळी, भाजप पदाधिकारी दीपक बाविस्कर, हेमंत जोहरी, जोगींदरसिंग जोहरी, प्रवीण पाटील, विशाल भोई, अजय भोई, प्रवीण अहिरे, पवन चित्रकथी यांच्यासह फसगत झालेले गॅस ग्राहक व कार्यकर्ते सामील झाले होते. या उपोषणाला भाजपचे प्रदीप पाटील, मनीष पारिख यांनी भेटी दिल्या.
@@AUTHORINFO_V1@@