मेमन समाजातील युवकांचा शिक्षण व व्यवसायाकडे कल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

इकबाल ऑफिसर यांचे पत्रपरिषदेत प्रतिपादन


जळगाव : 
 
मुस्लीम समाजातील एक घटक असलेला मेमन समाज हा 85 टक्के शिक्षित असून जगात 35 लाखांपेक्षा अधिक मेमन समाज आहे. भारतात त्यांची संख्या 15 लाखांपर्यंत आहे.
 
 
या समाजातील तरुण वर्ग आज शिक्षणाला अधिक प्राधान्य देत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन ऑल इंडिया मेमन फेडरेशनचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय मेमन कम्युुनिटीचे उपाध्यक्ष इकबाल ऑफिसर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले.
 
 
मागील 15 वर्षांपासून समाजाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे इकबाल ऑफिसर या समाजाच्या विविध समस्या आणि वर्तमान स्थिती यांचा आढावा घेण्यासाठी येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
मेमन समाजाबद्दल माहिती देताना म्हणाले की, हा समाज गोरगरीब जनतेसाठी काम करतो. अनेक शाळा आणि कॉलेजला आर्थिक मदतही देत असतो. पूर्वी मुस्लीम समाजात शिक्षणाचा अभाव होता, ते प्रमाण आता कमी होताना दिसत आहे.
 
 
हे सांगून ते म्हणाले की, हा समाज मुख्यत्वे व्यवसायातरमणारा असून सामाजिक एकोप्यासाठी नेहमी तत्पर असतो. समाजातील गरीब व्यक्तींना शिक्षण, गृहनिर्माण, विवाह, आरोग्य यासाठी सढळ हस्ते मदत केली जाते.
 
11 एप्रिल हा दिवस ‘जागतिक मेमन दिवस’ म्हणून साजरा करावा, यासाठी ‘युनो’कडे प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन केले.
यावेळी माजिदभाई बिबा, माजी उपमहापौर करीम सालार यांच्यासह समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती.
@@AUTHORINFO_V1@@