भुसावळ न.पा.वर महिलांचा टमरेल मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे यांना घेराव; प्रभाग 22 मध्ये स्वच्छता होत नसल्याने व्यक्त केला संताप


 
 
 
भुसावळ : 
 
शहरातील प्रभाग क्र. 19 व 22 मधील महिलांच्या शौचालयात तीन महिन्यांपासून स्वच्छता होत नसल्याने परिसरातील महिलांनी सोमवारी पालिकेवर टमरेल मोर्चा काढून उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांना घेराव घालून संतप्त भावना व्यक्त करून पालिका प्रशासनाला निवेदन सादर केले.
 
याबाबतच्या निवेदनात, येथील प्रभाग क्र. 19 व 22 मधील कृष्णानगरातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयाची गेल्या तीन महिन्यांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही.
 
यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच नागरिकांना उघड्यावर प्रात:विधी करावे लागत आहे. या प्रकाराने संतप्त महिलांनी पालिकेवर टमरेल मोर्चा काढला.
 
यावेळी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांना मोर्चेकरी महिलांनी घेराव घालत स्वच्छतेबाबत विचारणा केली. प्रभागांमधील शौचालयांचे सेफ्टी टँक तीन महिन्यांपासून तुंबले आहेत. मोर्चेकर्‍यांना तातडीने दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी महिला माघारी परतल्या.
स्वच्छता होत नसल्याने निघाला मोर्चा
 
शहरातील प्रभाग 19 व 22 मधील नागरिक कृष्णानगर, सिंधी कॉलनी, राज टेंट हाऊसच्या मागील भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. मात्र या शौचालयाच्या सेफ्टी टँक गेल्या मागील तीन महिन्यांपासून चोकअप झाल्या आहे.
 
 त्यामळे शौचालयाचा वापर करता येत नाही. उघड्यावर शौचालयासाठी जागा नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. याबाबत तीन महिन्यांपूर्वी नगरसेवक किरण कोलते यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.
 
नगरसेवक कोलते यांनी पालिकेत आठ ते दहा वेळा हे शौचालय व्हॅक्युमच्या सहाय्याने स्वच्छ करून वापर करण्याची मागणी केली. संतप्त महिलांनी 3 रोजी कृष्णानगर भागातून हातात टमरेल घेऊन पालिकेवर मोर्चा काढला. उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांना साकडे व घेराव घालून महिलांनी समस्या मांडल्या. समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन मकासरे यांनी दिल्यानंतर महिला घरी परतल्या.
@@AUTHORINFO_V1@@