पाचोर्‍यात माळी समाज मंडळातर्फे शिक्षकांचा गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

पाचोरा : 
 
माळी समाज पंच मंडळातर्फे कोंडवाडा गल्ली, समाज कार्यालय याठिकाणी महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण व दीपप्रज्वलन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार बी. ए. कापसे पाचोरा यांच्या हस्ते करण्यात आले. खरा शिक्षक दिन म्हणून पुस्तके देऊन 15 शिक्षिकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
 
 
प्रास्ताविक माऊली विठ्ठल महाजन यांनी केले. मनोगत प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे, नगरसेवक विकास पाटील, डॉ.गोरख महाजन व शिक्षकांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन एस. ए. पाटील तर आभार अध्यक्ष संतोष महाजन यांनी मानले.
 
 
कार्यक्रमास पंच मंडळांचे अध्यक्ष संतोष महाजन, सचिव गजानन महाजन, उपाध्यक्ष मयूर महाजन, शहर अध्यक्ष भाऊसाहेब महाजन, नगरसेवक विकास पाटील, वासुदेव महाजन, श्रीराम नाना महाजन, संभाजी ब्रिगेड सामाजिक सुरेश शिंदे, मराठा सेवा संघ दीपक पाटील, राजेंद्र पाटील, भूषण देशमुख, एन.ओ. ठाकरे, प्रमोद महाजन, साहेबराव महाजन, डॉ. गोरख महाजन, डॉ. संजय माळी, दीपक रोकडे, सुनील पाटील, प्रदीप वाघ, नितीन पाटील, चिंधू मोकळं, शुभम महाजन, रमेश मोरे, डॉ. चेतन महाजन, राकेश मिस्त्री, संजय महाले, डॉ. प्रवीण माळी, नथ्थू महाजन, ज्ञानेश्चर महाजन, शंकर महाजन, बापू महाजन, सुनील उमाळे, जगदीश मिस्त्री, किशोर महाजन, डॉ. संजय जाधव उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@