महात्मा फुले यांच्याबद्दल सोशलमिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍यावर कारवाई करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

वरणगावात माळी समाजातर्फे डीवायएसपींना दिले निवेदन



 
 
वरणगाव : 
 
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबद्दल सोशलमिडीयावर कपील सरोदे या समाजकंटकाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून माळी समाजासह बहुजन नागरिकांच्या भावना दुखावल्या आहे. कपील सरोदेवर गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी समस्त माळी समाजातर्फे मंगळवारी ४ रोजी वरणगाव पोलिस स्टेशनला डीवायएसपी सुभाष नेवे यांना निवेदन देण्यात आले.
 
माळी समाजातर्फे दिलेल्या निवेदनात नूमद करण्यात आले आहे की, दि.२ डिसेंबररोजी कपील सरोदे या समाजकंटकाने स्वत:च्या सोशलमिडीयाच्या फेसबुक अकाऊंटवरुन थोरसमाजसुधारक बहुजनांचे महानायक जगात शिवजयंती साजरी करणारे, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुवर्य राष्ट्रपीता महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली.
 
ही आक्षेपार्ह पोस्ट टाकून कपील सरोदे (मो.नं.८३२९८३९०६२) या हरामखोराने माळी समाजासह बहुजन समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.
 
त्याच्यावर सोशलमिडीया ऍक्टनुसार त्वरीत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी माळी समाजातर्फे निवेदनाद्वारे डीवायएसपी सुभाष नेवे यांना करण्यात आली आहे.
 
सहायक पोलिस निरीक्षक सारीका कुढापे, गोपनीय शाखेचे राहुल येवले उपस्थित होते. कारवाई नाही झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
 
यावेळी निवेदन देतेवेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, समाजाचे अध्यक्ष सोपान माळी, तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक बबलू माळी, युवा संघटनेचे अध्यक्ष दीपक माळी, उपाध्यक्ष बाळा माळी, किरण माळी, पंच संजय माळी, भगवान माळी, बापू माळी, गंभीर माळी, विकास माळी, विलास माळी, अमोल माळी, अतुल माळी, विजय माळी, योगेश माळी, विनोद माळी, अविनाश माळी, अनंत माळी, विनायक माळी, राहुल माळी, मनोज माळी, ज्ञानेश्‍वर माळी, चेतन माळी, कास्ट्राईब संघटनेचे विजय सोनवणे, राहुल माळी, जितेंद्र माळी, रा.ग.माळी, प्रताप माळी, उमेश माळी, गणेश माळी उपस्थित होते
@@AUTHORINFO_V1@@