केंद्रीय समितीकडून पोषण आहाराची पाहणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |
जळगाव :
 
जिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन केंद्रीय शालेय पोषण आहार समितीने सोमवारी पाच तालुक्यांमध्ये जाऊन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या पोषण आहाराची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत दररोज दिल्या जाणार्‍या आहाराबाबतची माहिती घेतली.
 
पोषण आहाराच्या तपासणीसाठी केंद्र शासनाची समिती सोमवारी जिल्हाभरातील शाळांमध्ये पाहणी करण्यात आली. केंद्रीय समितीच्या सदस्यांनी जळगाव, यावल, रावेर, धरणगाव, अमळनेर तालुक्यातील शाळांना भेटी देऊन पोषण आहाराची तपासणी केली तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या पोषण आहाराविषयी माहिती घेतली.
 
 
शाळांच्या भेटीदरम्यान शालेय पोषण आहाराची गुणवत्तेसह विद्यार्थ्यांशी व्यक्तीगत पातळीवर संवाद साधला. तसेच काही विद्यार्थ्यांच्या पाल्यांशीदेखील चर्चा करून विद्यार्थ्यांना नियमित आहार दिला जातो का? त्याची गुणवत्ता कशी असते? याबाबतची परिस्थिती भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी व पालकांकडून माहिती जाणून घेलती.
 
 
ही समिती मंगळवारीही शाळांना भेटी देऊन पोषण आहाराबाबतची माहिती समितीचे सदस्य घेत आहेत. यावेळी समितीचे मुख्य सल्लागार भूपेंद्र कुमार, सदस्य दिनेशकुमार प्रधान, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, उपशिक्षणाधिकारी डी.एम.देवांग आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@