शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

मुंबई : शेअर बाजारात सलग सहा सत्रातील तेजीला मंगळवारी ब्रेक लागला. आयटी सेक्टर वगळता सर्व शेअर घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०६ अंशांनी घसरुन ३६ हजार १३४ वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४ अंशांनी घसरुन १० हजार ८६९ वर बंद झाला. जागतिक शेअर बाजारातही जपान, दक्षिण कोरियासह अन्य बाजारातही घसरण झाली.

 

शेअर बाजाराच्या घसरणीमुळे ब्ल्यु चिप फंड शेअरमध्ये घसरण झाली. यात रिलायन्स, हिंदूस्थान युनिलिव्हर, आयटीसी, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, एसबीआयमध्ये दीड ते दोन टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये बीपीसीएलचा शेअर सर्वाधिक २.७९ टक्क्यांनी वधारला. दिवसअखेर ३३३ वर बंद झाला. इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स २.६४ टक्क्यांनी मजबूत झाला. युपीएल, इन्फोसिस, ओएनजीसीमध्ये दोन ते अडीच टक्क्यांनी वाढ झाली.

 

दरम्यान सन फार्मा सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. शेअर २.७२ टक्क्यांनी घसरुन ४४३च्या स्तरावर बंद झाला. आयटी शेअरमध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. विप्रोमध्ये १.८९ टक्के, इन्फोसिसमध्ये १.८९ टक्के, एचसीएल टेकमध्ये १.८५ टक्के, टीसीएसमध्ये १.३८ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@