आपल्यातील दिव्यांग शक्तीचा सकारात्मक वापर करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

दिव्यांग दिनानिमित्त महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे आवाहन



 
 
फैजपूर ता. यावल : 
 
दिव्यागांनी आपल्यातील दिव्यांग शक्ती ओळखून तिचा राष्ट्र व समाजासाठी सकारात्मक वापर करावा, असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केले.
 
दिव्यांग सेनेच्या विद्यमाने श्रीरामपेठ मैदानावर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरिजी महाराज होते, यावेळी त्यांनी आपले विचर मांडले.
 
 
प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले म्हणाले की देशात प्रथमच निवडणूक आयोगाने दिव्यांग नागरिकांसाठी दिव्यांग दिनाचे उद्दिष्ट घेऊन आज त्यांच्यासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. शासनानेदेखील विशेष दर्जा देत त्यांना मदतीचा हातभार लावला आहे.
 
 
याप्रसंगी सर्कल जे. डी. बंगाळे यांनी दिव्यांगांच्या शासन दरबारी दिव्यांच्या लाभ योजनांची माहिती दिली व त्यासाठी दिव्यांग यांना भरीव सहकार्य देऊ, असे अभिवचन दिले.
 
 
यावेळी दिव्यांग सेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिव्यांग दिनानिमित्त महामंडलेश्वर जनार्दन महाराज व प्रांत डॉ. थोरबोले, बंगाले, तलाठी खान यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
 
 
याप्रसंगी सभामंचवर महामंडलेश्वर जनार्दन हरिजी, प्रांत थोरबोले, जिल्हा दूध संघ संचालक व नगरसेवक हेमराज चौधरी, सपोनि दत्तात्रय निकम, दिव्यांग सेनाध्यक्ष नितीन महाजन, राहुल कोल्हे, ललित वाघुळदे, भाजपा शहराध्यक्ष संजय रल, नारी शक्ती ग्रुप अध्यक्ष दीपाली झोपे, सेना महिला प्रमुख रजनी चौधरी, इरफान मेंबर, अशोक भालेराव आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@