ल्युका मॉड्री - फुटबॉलचा नवा बादशहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |



ल्युका मॉड्री ठरला बॅलोन डी ओर - २०१८चा मानकरी


नवी दिल्ली : फुटबॉल विश्वातील २०१८चा मानाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा बॅलोन डी ओरहा पुरस्कार क्रोएशियाचा कर्णधार ल्युका मॉड्री याला देण्यात आला आहे. 'बॅलोन डी ओरहा मानाचा पुरस्कार पटकावणारा ल्युका मॉड्री क्रोएशिया पहिला खेळाडू ठरला. विशेष म्हणजे, तब्बल १० वर्षानंतर फुटबॉल विश्वातील एका नव्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात आला आहे. कारण मागील दहा वर्ष पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी याच दोघांचं या पुरस्कारावर वर्चस्व होते.
 

३३ वर्षीय मॉड्रीने मागील सत्रात रियल मैड्रिडला सलग तिसऱ्या वेळेस चॅम्पियन लीगची ट्रॉफी जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मॉड्रीने क्रिस्टियानो रोनाल्डो, पेरिस सेंट जर्मेन, कलियान म्बापे, एंटोनी ग्रिजमैन यांना मागे टाकून हा पुरस्कार जिंकला. रोनाल्डो आणि मेसी यांच्यापेक्षा तब्बल २७७ गुणांच्या फरकाने या पुरस्कारावर मॉड्रीने आपले नाव कोरले. दरम्यान, ॲडा हिगेर्बर्ग हिला सर्वोकृष्ट महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

 

यावर्षी मॉड्रीने विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल, ‘युएफाचा सर्वोत्तम खेळाडू, ‘फिफाचा सर्वोत्तम खेळाडू आणि बॅलोन डि ओरअसे पुरस्कार पटकावले आहेत. फुटबॉल इतिहासात एकाच वर्षात हे चारही मानाचे पुरस्कार जिंकणारा मॉड्री पहिलाच खेळाडू ठरला आहे. तो यावेळी म्हणाला, "‘बॅलोन डि ओरपुरस्कार जिंकणे म्हणजे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. हा माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@