इस्रोच्या 'जीसॅट - ११'चे उद्या प्रेक्षपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |



बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो उद्या (५ डिसेंबर) जीसॅट - ११ उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. भारताचा आत्तापर्यंतचा हा सर्वांत अवजड उपग्रह असून यामुळे देशात इंटरनेट क्रांती घडेल असे सांगितले जात आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या एरियन-५ या रॉकेटने फ्रेन्च गुएना येथून हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे.

 

जीसॅट - ११ हा उपग्रह ५ डिसेंबरला सकाळी २.०७ ते ३.२३ वाजेदरम्यान होणार असल्याचे यूरोपियन स्पेस ट्रांसपॉर्टर एरियनस्पेसने आपल्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. या उपग्रहाचे तब्बल ५ हजार ८५४ किलो वजन असून जमिनीपासून ३६ हजार कि.मी. अंतरावर हा उपग्रह स्थिरावणार आहे. या उपग्रहाच्या प्रेक्षपणानंतर देशात प्रति सेकंदाला १०० जीबीपेक्षा जास्त इंटरनेट स्पीड मिळू शकतो. अशी माहिती इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी दिली.

 

मार्च-एप्रिल महिन्यामध्येच जीसॅट-११चे प्रेक्षपण अपेक्षित होते. मात्र, जीसॅट-६ या उपग्रहाच्या अपयशानंतर जीसॅट-११चे प्रेक्षपण लांबणीवर पडले होते. दरम्यान, जीसॅट-११ उपग्रहाच्या प्रेक्षपणानंतर संपूर्ण देशाचे भौगोलिक क्षेत्र अवाक्यात येऊ शकणार आहे. तसेच अनेक गोष्टींमध्ये क्रांती घडणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@