रा.काँ.भवनात डॉ.राजेंद्रप्रसाद, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 3 रोजी माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची जयंती तसेच खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी व जागतिक दिव्यांगांसाठी काम करणार्‍या हेलन केअर या सर्वांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
यावेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महानगरचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी यांच्या हस्ते प्रतिमांना पूजन करून अभिवादन करण्यात आले.
 
कार्यक्रमाचे आयोजन वाय.एस.महाजन यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, महिला महानगराच्या जिल्हाध्यक्षा निला चौधरी, महानगर लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सचिन चव्हाण, महिला कार्यकर्त्या शकिला तडवी, योगेश देसले, रहिम तडवी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@