शेवगे येथे किसान विद्यालयात गोवर, रुबेला लसीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

 
 
पारोळा : 
 
तालुक्यातील शेवगे बु.येथील किसान माध्यमिक विद्यालयात गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यात माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
 
भारत सरकारने सन 2020पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला व्हायरसला नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार 27 नोव्हेंबरपासून आपल्या राज्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहीम ठिकठिकाणी राबविली जात आहे.
 
 
यावेळी वैद्यकीय अधिकारी शशिकांत चौधरी यांनी गोवर, रुबेला लसीकरणाबाबत माहिती दिली.तसेच सरपंच आशाबाई सुभाष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यासोबतच त्यांनी शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.
 
 
त्यावेळी ग्रामसेविका नितल निंबा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील (सोनू), आरोग्यसेविका आशा सावंत, आशासेविका वैशाली पाटील, अंगणवाडी सेविका भिकूबाई देशमुख, शालुबाई पाटील, कमलबाई पिरण निकम, शिक्षक आर.एम. पाटील, संजय जाधव, दीपक जाधव, अधिकराव सोनवणे व विद्यार्थी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@