गणितनगरीचे राज्यपालांच्या हस्ते 22 रोजी कोनशिला अनावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

आ. पाटील यांंनी केली स्थळाची पाहणी


चाळीसगाव : 
 
राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे भास्कराचार्य गणितनगरी पाटणादेवी येथे होणार्‍या भास्कराचार्य गणितनगरी कोनशिला अनावरण व राज्य मराठी विज्ञान परिषद संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी 22 डिसेंबर रोजी येत आहेत.
 
या पार्श्वभूमीवर गणितनगरीची संकल्पना मांडून गणितनगरी प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील व कार्यरत असलेले चाळीसगाव तालुक्याचे आ. उन्मेश पाटील यांनी पाटणादेवी येथे कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
 
 
याप्रसंगी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, विभागीय वनाधिकारी काळे, उपविभागीय वनाधिकारी काळे, गणितनगरी डिझायनर दिलीप गोटखिंडीकर, आर्कि. शलाखा गोटखिंडीकर, आर्कि. चैताली जुनागडे, गुरुकुल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पाठक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कुशल संघटक नरेंद्र जैन, मंदार पाठक आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@