धोनी आणि धवनवर गावस्कर नाराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |



 
 
नवी दिल्ली : क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन हे दोघे स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत का नाहीत? असा सवाल माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केला आहे. आपला खेळ सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही खेळणे महत्वाचे आहे. असे गावस्कर यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका क्रिकेटपटू शिखर धवन खेळणार नाही. असे असेल तर शिखर धवन हा देशांतर्गत होणाऱ्या कसोटी स्पर्धांमध्ये का खेळत नाही?
 

धोनीदेखील वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीमध्ये खेळल्यानंतर एकाही स्थानिक क्रिकेट सामन्यात खेळलेला नाही. परंतु हे दोन्ही क्रिकेटपटू पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळणार आहेत. याविषयी सुनील गावस्कर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन हे दोघेही राष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये का खेळत नाही? असा प्रश्न विचारून सुनील गावस्कर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बीसीसीआयची निवड समिती कोणत्या निकषांच्या आधारावर या दोन क्रिकेटपटूंना स्थानिक क्रिकेट स्पर्धांमधून सूट देते. असेही गावस्कर म्हणाले. सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी कोणत्याही खेळाडूला सातत्याने सराव करणे गरजेचे असते. त्यामुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय सामने नसतील तेव्हा खेळाडूंनी स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घ्यायला हवा. असे मत गावस्करांनी मांडले. विश्वचषक स्पर्धेला अवघे दोन महिने बाकी आहेत. असे असताना या दोन महिन्यात कोणताही सामना न खेळता या दोघांना थेट विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली तर त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतील.” असे सुनील गावस्कर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@