बोदवडमध्ये ‘एक चहा’ देशासाठी कार्यक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

अनाथ, आत्महत्याग्रस्तांच्या मदतीसाठी आत्मसन्मान फाउंडेशनचा उपक्रम


 
 
बोदवड : 
 
आत्मसन्मान फाउंडेशनकडून आयोजित ‘एक चहा’ देशासाठी हा कार्यक्रम उत्साहात झाला.आत्मसन्मानकडून राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांसाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने संस्थेकडून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये एक चहा देशासाठी गरजू व वंचितांच्या हितासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
 
 
विद्यार्थ्यांना एम. पी. एस. सी व यू.पी.एस.सी व इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी कन्या व पुत्र अभ्यासिका बोदवडमध्ये चालविली जात आहे.
 
 
या व्यतिरिक्त ग्रामीण भागात व्हिलेज कॉम्प्युटर अँड नेटकॅफे एकता फिटनेस क्लब असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहे. उपक्रमांना आर्थिक मदत व्हावी, या हेतूने संस्थेकडून दरवर्षी ‘एक चहा’ देशासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
 
 
संस्थेकडून गावोगावी जयंती, वाढदिवस, लग्न आणि स्वतःचे व्यसन यावरील अतिरिक्त खर्च टाळून गरजू व वंचितांच्या हितासाठी मदत करा, असे व्यापक अभियान संस्थेकडून राबविले जात आहे. बोदवडमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचा शिक्षण सहायता उपक्रम
 
संस्थेकडून अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांना शैक्षणिकरीत्या दत्तक घेऊन त्यांना आधार देणे, यासाठी शिक्षण सहाय्यता उपक्रम राबविला जात आहे.
 
नैराश्यात बुडालेल्या व जीवनात उमेद हरलेल्यांना पुन्हा जीवनाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्थेकडून ‘मन परिवर्तन कौन्सिलिंग सेंटर’ चालविले जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@