गंभीरचा क्रिकेटला अलविदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |


नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले. “माझ्यासाठी हा सर्वात कठीण असा निर्णय आहे. जड अंत:करणाने मी त्यास सामोरा जात आहे,” अशा भावना गौतम गंभीरने हा निर्णय घेताना व्यक्त केल्या आहेत.

 

क्रिकेट माझ्यासाठी सर्वस्व होते आणि आहे. त्यापासून कधीतरी दूर जावे लागेल, हे माहीत होतंच. मात्र, आज प्रत्यक्ष तो दिवस आयुष्यात आला असताना भावना अनावर होत आहेत,” अशा शब्दांत गंभीरने मन मोकळे केले. गंभीरने ट्विटर आणि फेसबुकवर एक भावनात्मक व्हिडिओही पोस्ट केला आहे. गंभीरने आयपीएलच्या आगामी मोसमातही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गंभीरने २००३ मध्ये बांगलादेशविरुद्ध ढाका येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

 

प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने एकूण १५ हजार, ४१ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना गौतम गंभीरने या संघाला २०१२ आणि २०१४ मध्ये दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे. २०११ मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध गंभीरने चमकदार कामगिरी केली होती. त्याने १२२ चेंडूंमध्ये ९७ धावा ठोकून टीम इंडियाचे नाव वर्ल्डकपवर कोरले होते. १९८३ नंतर दुसर्‍यांदा भारताने हा वर्ल्डकप जिंकला होता. तसेच २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपमधील विजेत्या टीम इंडियाचाही तो भाग होता.भारतीय क्रिकेटमधील आपल्या अतुलनीय योगदानाबद्दल गौतम गंभीरला २००८ मध्ये प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@