‘काबरा’चे विद्यार्थी डॉ.होमीभाभा वैज्ञानिक स्पर्धेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
एस.काबरा क्लासेसच्या 50 विद्यार्थ्यांची डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती क्लासेसच्या संचालिका सुवर्णा काबरा यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
 
 
त्या पुढे म्हणाल्या की, डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक केंद्रातर्फे इंटरन्स (प्रवेश) परीक्षा झाली. त्यात इयत्ता 6 वीचे 20 व 9 वीच्या 30 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात एकूण 17 मुली आहेत.
 
 
जळगाव, जामनेर, अमळनेर, धुळे येथील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी एस.काबरा क्लासेसतर्फे दर आठवड्यातून तीन दिवस तयारी करून घेतली जाते. गेल्या 14 वर्षांपासून क्लासेसतर्फे हा उपक्रम सुरू आहे. सहावीची परीक्षा 9 डिसेंबर तर 9 वीची 23 डिसेंबरला कोथरुड, पुणे येथील बाल शिक्षण मंदिरात होईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
महाराष्ट्रातून 60 हजार मुले या परीक्षासाठी असतात. त्यातून पहिल्या लेव्हलसाठी 7.5 टक्के, दुसर्‍या लेव्हलसाठी 10 टक्के तर तिसर्‍या लेव्हलसाठी 10 टक्के मुलांची निवड होते.
 
 
तिसर्‍या लेव्हलसाठी मुलाखत घेण्यासाठी मोठे शास्त्रज्ञ येतात. त्यानंतर ज्या मुलांची निवड होते, त्यांना सिल्व्हर, सुवर्ण पदक मिळतात. नाशिक, पुणे, नगर, नागपूर, अमरावती येथील मुले डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेसाठी जळगावी येतात, असेही सुवर्णा काबरा यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@