महाडमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्याने झाडल्या गोळ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |
 

महाड : तालुक्यातील पंदेरी भागात काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते सयाजी रामचंद्र जाधव (वय ४६) यांना गोळीबार केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास अटक केली. या प्रकरणी पोलादपूर तालुक्यातील पैठण व महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक या ठिकाणावरून अन्य दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

महाडच्या पंदेरी गावा ३ डिसेंबर, २०१८ रोजी १० वाजताच्या सुमारास या गावातील आरोपी सयाजी रामचंद्र जाधव (वय ४६) यांनी आपल्या ताब्यातील विनापरवाना दोन बार बंदुकीने हवेत गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांच्या जीविताला धोका उत्पन्न होईल, असे कृत्य करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी राजेश यशवंत माने (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हाडे मारीची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

आरोपींकडे केलेल्या चौकशीनुसार, महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे महेंद्र शिवराम महामुणकर (वय ४७) व पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील सुभाष भाऊराव मोरे (वय ६६) यांना ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आबासाहेब पाटील हे करत आहेत.

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@