कवयित्री बहिणाबाईंच्या ओव्या हृदयात भिडणार्‍या : चंद्रकांत भंडारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरीवाड्यात आठवणींचे पूजन


जळगाव : 
 
बहिणाबाई चौधरी यांचे काव्य वाचता-वाचता आपलंस करणारे असून भाषा, प्रांत या प्रतिकांचा भाग त्यांच्या कवितांच्या आड येत नाही. त्या सर्वांच्या हृदयात भिडतात. भगवद्गीतेत सर्वच तत्त्वज्ञान सामावले आहे.
 
मात्र, बहिणाईंची कवितासुद्धा मानवाला दिशा देण्यासाठी गीतेइतकीच श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांनी केले.
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे चौधरीवाड्यातील ‘बहिणाबाई स्मृती संग्रहालय’ येथे बहिणाबाईंना अभिवादन करण्यात आले.यावेळी चंद्रकांत भंडारी बोलत होते.
 
 
याप्रसंगी बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त ज्योती जैन, बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतुसून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, कैलास चौधरी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.
 
 
भगवान छगन खंबायत यांनी ‘मन वढाय वढाय’ ही कविता म्हटली. अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बहिणाबाईंच्या कवितांमधील आलेल्या शब्दांची उकल संग्रहालयाने जतन केलेल्या साहित्यातून व्हावी, यासाठी मराठी शिक्षक परशुराम माळी यांच्यासह विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
 
 
विद्यार्थांपैकी चिन्मय कलंत्री याने ‘पेरणी पेरणी आले पावसाचे वारे’ ही कविता म्हटली. याप्रसंगी शरद पाटील, पी. के. देवरे, गिरीश पाटील, तुषार वाघुळदे यासह साहित्यिक रसिकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
 
 
चौधरीवाड्यातील सरला पाटील, प्रिया चौधरी, काजल चौधरी, शोभा चौधरी, इंदू चौधरी, मिनल चौधरी, शशिकला चौधरी, कोकिळा चौधरी, लक्ष्मीबाई चौधरी, हितेश चौधरी, कविता चौधरी, अशोक अत्तरदे यांची उपस्थिती होती.
 
 
यशस्वितेसाठी रंजना चौधरी, अशोक चौधरी, दिनेश दीक्षित, विजय जैन, देवेंद्र पाटील, राजू हरिमकर, दिनेश थोरवे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद रापतवार यांनी केले.
 
 
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चंद्रकांत भंडारी म्हणाले, विद्यार्थ्यांनी एकमेकांना सहकार्य करून पुढे जावे. स्वतःला ओळखून वाचन, श्रवण वाढविले पाहिजे असे सांगून त्यांनी इसाप नितीच्या गोष्टींमधील महत्त्व समजावून सांगितले.
सोपानदेवांचे दुर्मीळ पत्र संग्रहालयाला भेट
 
फैजपूर येथील रामचंद्र नथ्यू जावळे यांनी सोपानदेवांच्या 1980-81 मधील हस्ताक्षरांची पत्रे व छायाचित्रे ट्रस्टला संग्रहासाठी सुपुर्द केली. यावेळी सोपानदेवांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
 
 
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या स्मृती संग्रहालयात बहिणाबाई वाड्यात त्यांनी वापरलेल्या वस्तू, साहित्य जतन करण्यात आले आहे. सोपानदेवांच्या हस्ताक्षरांच्या पत्रांची यात मोलाची भर पडली आहे.
 
 
ट्रस्टतर्फे संशोधनासाठी प्रोत्साहन
 
बहिणाबाई चौधरी यांचे काव्य, साहित्यावर संशोधन करणार्‍यांना बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. नृत्यांगणा दीप्ती विजय पावडे या बहिणाबाईंच्या काव्यावर अभ्यास करीत आहे.
 
 
तर प्रा. एन. एम. देशमुख हे बहिणाबाईंच्या साहित्यावर आणि पुणे येथील आर्किटेक्चर कॉलेजमधील यश शेटे हे बहिणाबाईंचे सासर आणि माहेरातील संग्रहालयाचा अभ्यास करीत आहे. या सर्वांना बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे आवश्यक ते संशोधन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@