दीपस्तंभ मनोबल येथे अपंग दिन साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

मेरिको कंपनीतर्फे लॅपटॉप व एंजल प्लेयर भेट


 
जळगाव : 
 
अंध, अपंग विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी सुरू असलेल्या दीपस्तंभ मनोबल निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र येथे जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
 
या प्रसंगी जिल्हा विधि प्राधिकरणतर्फे जिल्हा विधि प्राधिकरण सचिव कौशिक ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना दिव्यांग अधिनियम 2016 तसेच विधि प्राधिकरणबाबत प्राथमिक माहिती दिली.
 
 
मेरिको लिमिटेड कंपनीतर्फे अंध विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त एंजल प्लेयर तसेच लॅपटॉप भेट देण्यात आले. मेरिको कंपनीचे श्रीकृष्ण वाणी म्हणाले की, दिव्यांगांना सहकार्य करणे ही त्यांना मदत नसून ते आपले कर्तव्य आहे.
 
समाजातील सर्व घटकांनी दिव्यांगांच्या पाठिशी उभे राहून त्यांना सक्षम करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. मनोबलचे कार्य देशातील आगळे-वेगळे सेवा केंद्र आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी मेरिको कंपनीच्या विशाखा बापट, वर्क हेड प्रसाद, एस. श्रीनाथ उपस्थित होते.
 
सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण यांनी केले तर आभार सागर शिरसाठ यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@