बोदवड तहसील कार्यालयात दिव्यांग दिन साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

आ. एकनाथराव खडसे यांंच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप


 
 
बोदवड : 
 
येथील तहसील कार्यालयात दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे यानी अपंग बांधवांच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
 
 
तसेच 1 जानेवारी 2019 पासून त्यांच्या मानधनातसुध्दा वाढ होणार आहे. कुणालाही रेशन कार्डासाठी पैसे मोजावे लागणार नाही. हक्काचे रेशन सर्वांना मिळालेच पाहिजे, अपंग बांधवांना शासकीय कार्यालयात कोठेही अडचण आल्यास त्यांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहन आ. खडसे यांनी केले आहे.
 
तसेच प्रत्येकाने जॉब कार्ड काढून घ्यावे. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर असून बोदवड तालुक्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही.
 
तो महाराष्ट्रात कोठेही असो, शाळेतील विद्यार्थी यांना पासेस विनामूल्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार रवींद्र जोगी, पं.स. सभापती गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, संचालक रामदास पाटील बोदवड नगराध्यक्ष मुमताज बी. बागवान, कैलास चौधरी, तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, दीपक वाणी, भगतसिंग पाटील, विनोद चौधरी उपस्थित होते.
 
 
बोदवड तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. त्यात कोल्हाडी चिंचखेडसिम नाडगाव रेल्वेगेट ते आमदगाव रस्ता डांबरीकरण निमखेड फाटा ते निमखेड डांबरीकरण हरणखेड फाटा डांबरीकरण, मनूर कुर्‍हा डांबरीकरण, घानखेड शेवगा आदी कामाचे भूमिपूजन झाले.
 
तहसीलदार रवींद्र जोगी व पुरवठा अधिकारी संजय पाटील यांनी अपंग, विधवा, वयोवृद्ध, रोग पीडित बांधवांना तब्बल दोनशे शिधापत्रिका वाटप केली.
@@AUTHORINFO_V1@@