अवघ्या ४ तासात मिळणार ई-पॅनकार्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |



 
 
 
नवी दिल्ली : पॅन कार्ड बनवण्यासाठी आता भारतीयांना खस्ता खाव्या लागणार नाहीत. कोणत्याही वेळखाऊ प्रक्रियेला आता भारतीयांना सामोरे जावे लागणार नाही. पॅन कार्ड बनविण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी होणार आहे. अवघ्या चार तासांत आता ई-पॅन कार्ड बनविण्याच्या योजनेवर सध्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) काम करत आहे. अशी माहिती सीबीडीटीचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली.
 

सीबीडीटी आता चार तासात ई-पॅन कार्ड देण्याची सुविधा लवकरच सुरू करणार आहे. यासाठी एक नवीन कार्यप्रणाली अमलात आणण्यात येणार आहे. हे ई-पॅन कार्ड बनविण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड दाखवावे लागणार आहे.” असे सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे. २०१७ मध्ये एप्रिल महिन्यात सीबीजडीटीने ई-पॅन सुविधा सुरु केली. या सुविधेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराला ईमेलच्या माध्यमातून पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी पीडीएफ स्वरुपात पाठवली जाते. ही कॉपी अर्जदाराला वापरता येते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@