रिक्षाचालकांच्या प्रश्नांबाबत परिवहन कार्यालयात बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

प्रश्न सोडविण्याचे परिवहन आयुक्तांचे आवाहन


जळगाव : 
 
रिक्षाचालक-मालकांच्या प्रश्नांबाबत राज्यातील रिक्षा संघटना प्रतिनिंधीची बैठक बांद्रा, मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयात नुकतीच घेण्यात आली.
 
 
बैठकीत रिक्षा संघटना प्रतिनिधींची नवीन परवाने बंद करणे, परिवहन विभागांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, इन्शूरन्सचे वाढलेले दर कमी करणे, ओला उबरसह बेकायदेशीर वाहतूक बंद करणे यासह विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी संबंधित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
 
 
यावेळी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अशोक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, प्रमोद घोणे, मारुती कोडे, गफ्फार नदाफ, सहसचिव मच्छिंद्र कांबळे, महेश चौघुले, आनंद तांबे, फिरोज मुल्ला, सुरेश गलांडे, भारत नाईक, सुनरल बोंर्डे, आनंद चौरे, जळगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे सुनील जाधव, दीपक सोनवणे, ताराचंद्र पाटील, भैया पेंटर, असलम शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रश्न मांडणार्‍या पदाधिकार्‍यांचे प्रल्हाद सोनवणे यांनी आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@