भुसावळमध्ये शनिवारपासून ‘बहिणाबाई महोत्सव’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

पाच दिवस चालणार भरगच्च कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांची उपस्थिती


भुसावळ : 
 
महिला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याची संकल्पना मांडणार्‍या महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने गुरुनाथ फाउंडेशन मुक्ताईनगरच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन 8 ते 12 डिसेंबरदरम्यान करण्यात आले आहे.
 
 
या महोत्सवात बचत गटांचे विविध स्टॉल व समाजातील सर्वच स्तरांसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे.
 
 
आयोजित पाचव्या बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन 8 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे असतील. विशेष अतिथी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महानंदा अध्यक्षा मंदाताई खडसे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरु डॉ. पी.पी.पाटील असतील. प्रमुख अतिथी खा.ए.टी. पाटील, आ. हरिभाऊ जावळे, आ. संजय सावकारे, आ. चैनसुख संचेती, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. राजूमामा भोळे, आ. शिरीष चौधरी, आ. डॉ. सतीश पाटील, आ. उन्मेश पाटील, आ. किशोर पाटील, आ. स्मिताताई वाघ, आ. चंदूलाल पटेल, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील (जळगाव), जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि. प. अध्यक्षा उमाताई तायडे (बुलडाणा), माजी आ. डॉ. गुरुमुख जगवाणी, बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय स्वयंसेवक डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, जि.प.महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण (जळगाव), जि.प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले (बुलडाणा), जि.प. शिक्षण सभापती पोपट भोळे, निखिल खडसे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शारदा खडसे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे असतील. यानिमित्ताने सायंकाळी 5 वाजता विविध निवडक कलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे.
 
 
दुसर्‍या दिवशी 9 डिसेंबर रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या दिवशी दुपारी 2 वाजता कृषिभूषण सीताबाई मोहिते (जालना), स्टेपअप इंडिया अध्यक्षा यती राऊत (पालघर) या बचत गट महिला मार्गदर्शन करणार आहे.
 
सायंकाळी 5 वाजता विविध वयोगटात फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सायंकाळी सांस्कृतिक कलानिकेतननिर्मित व मुकेश खपली दिग्दर्शित ‘कान्हादेश लोकधारा’ महानाट्याचे सादरीकरण होईल. 10 डिसेंबर रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांची प्रमुख उपस्थिती असेल.
 
दुपारी 2 वाजता प्रा. यजुर्वेंद्र महाजन ‘उत्तुंग भरारी घेऊया...’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सायं. 5 वाजता परिवर्तन जळगाव आयोजित ‘अरे संसार संसार...’ या बहिणाबाईंच्या कविता व गीतांची सुरेल मैफिल, सायं.7 वाजता एन. सी. सरकार (नागपूर), रात्री 8 वाजता खुले व्यासपीठ. 11 डिसेंबर रोजी माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे, आ. संजय सावकारे, डीआरएम आर. के. यादव, प्रांत डॉ. श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, डीवायएसपी गजानन राठोड, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाव्यवस्थापक राजीव पुरी, वरणगाव फॅक्टरीचे महाव्यवस्थापक एस. चटर्जी, एपीआय दीपक गंधाले, पो.नि. बाळासाहेब ठोंबे, पो.नि. देवीदास पवार हे प्रमुख अतिथी असतील. दुपारी 3 वाजता डॉ. प्रभाकर जोशी (अमळनेर) ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन. सायं 5 वाजता लोक संवाद कार्यक्रमात ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर व्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यान. सायं. 6 वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम सचिन सावंत (पुणे) सादर करतील. रात्री 8.30 वा. खुले व्यासपीठ.
मुख्यमंत्र्यांचे हस्ते बक्षिस वितरण
 
12 डिसेंबर रोजी सायं. 5 वा. बक्षीस वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी आ. एकनाथराव खडसे, विशेष अतिथी जलसंपदामंत्री गिरीश महाजन असतील.
 
प्रमुख अतिथी संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पं.स. सभापती प्रीती पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे असतील. सायंकाळी गायक आदर्श शिंदे यांचा सिनेगीतांच्या कार्यक्रम सायं. 7 वा. होणार आहे.
 
सहभागाचे आवाहन
 
सहभागी होण्याचे आवाहन महोत्सवाचे आयोजन गुरुनाथ फाउंडेशन मुक्ताईनगरच्या अध्यक्ष खा. रक्षाताई खडसे, महोत्सवप्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे, स्वागताध्यक्ष आ. संजय सावकारे, कार्याध्यक्ष नगराध्यक्ष रमण भोळे, महोत्सव सहप्रमख तथा पं.स. सभापती प्रीती पाटील, महोत्सव सहकार्यवाहक लक्ष्मी मकासरे यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@