स्मृती मंधाना ठरली सर्वोकृष्ठ खेळाडू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आय.सी.सी.) सोमवारी २०१८ वर्षातील महिला एकदिवसीय आणि टी-२० संघाची घोषणा केली. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्मृती मंधाना आणि हरामनप्रीत कौर यांचा समावेश करण्यात आला आहे. हरमनप्रीतची आंतरराष्ट्रीय टी-२० संघाची कर्णधार म्हणून निवडण्यात आली, तसेच स्मृती मंधानाचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली. यासह स्मृतीला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. तसेच, वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्कार जाहीर करण्यात आला.

 

स्मृतीने वर्षभरात १२ एकदिवसीय सामन्यात ६७च्या सरासरीने ६६९ धावा केल्या. तर २५ टी२० सामन्यांत सुमारे १३०च्या स्ट्राईक रेटने ६२२ धावा लगावल्या. स्मृतीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप टी२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तिने या स्पर्धेत ५ सामन्यांत १२५.३५च्या स्ट्राईक रेटने १७८ धावा केल्या होत्या. आयसीसीच्या महिला क्रिकेटपटूच्या एकदिवसीय क्रमवारीत ती चौथ्या तर टी२० क्रमवारीत १०व्या स्थानी आहे.

 
 
 

आंतरराष्ट्रीय टी-२० संघात मंधाना आणि हरमनप्रीतशिवाय पूनम यादवचाही फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केला गेला आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघामध्ये न्युझीलँड, भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघातील प्रत्येकी दोन खेळाडू निवडण्यात आले. तर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्टइंडिज संघातील प्रत्येकी फक्त एका खेळाडूला या संघामध्ये स्थान मिळाले आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@