शेख हसीना चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधानपदी शेख हसीना पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. पंतप्रधान होण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे. बांगलादेशात झालेल्या मतदानादरम्यान हिंसाचार घडला होता. त्यामध्ये १७ जण ठार झाले होते. बांगलादेशमध्ये ३०० जागांपैकी २९९ जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण १,८४८ उमेदवार उभे होते. बांगलादेशमध्ये रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीला मतदानादरम्यान घडलेल्या हिंसाचारामुळे गालबोट लागले.
 

शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नेतृत्वाखाली आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. २९८ पैकी २८७ जागांवर त्यांना विजय प्राप्त झाला. अवामी लीगचा विरोधीपक्ष आघाडी नॅशनल युनिटी फ्रंटला फक्त ६ जागांवरच विजय मिळवता आला. दोन अपक्ष उमेदवार दोन जागांवर निवडून आले आहेत. एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तेथे निवडणुक झाली नाही.

 

दक्षिण-पश्चिम गोपालगंज मतदार संघात शेख हसीना यांना एकूण २,२९,५३९ मते मिळाली. शेख हसीना यांचा प्रतिस्पर्धी बीएनपीच्या उमेदवाराला फक्त १२३ मते मिळाली आहेत. अशी माहिती बांगलादेशच्या निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. बांगलादेशमधील विरोधी पक्ष एनएफयू आघाडीने मात्र निवडणूकीचा हा निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा निवडणूका घेण्यात याव्यात. अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@