जगभरात नववर्षाला सुरुवात ; न्यूझीलंडमध्ये आकर्षक आतषबाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |



वेलिंग्टन : अवघ्या काही तासानंतर नववर्षाला सुरुवात होणार आहे. जगभरात याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. तर, सर्वप्रथम नववर्ष धडकणाऱ्या न्यूझीलंड या देशाने मोठ्या दिमाखात २०१९चे स्वागत केले आहे. ऑकलंड येथे यासाठी नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. यानंतर पूर्वेकडील देशानंतर नववर्ष पश्चिमेच्या देशांकडे वळत आहे. संपूर्ण जगभर नववर्षाच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे.

 

२०१८ या वर्षाची सांगताही केली जात आहे. जगभरात न्यूझीलंड येथे सर्वप्रथम नववर्ष धडकतो. त्यानंतर सिडनी आणि नंतर पश्चिम देशांकडे वळत असतो. आशियामध्ये जापान येथे नववर्ष सर्वप्रथम धडकणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी पूर्णपणे मोहक दिव्यांनी सजली आहे. तसेच तेथे १२चा ठोका पडताच आकाशामध्ये रंगीत आतषबाजी करण्यात आली. नववर्ष अमेरिकेच्या बकेर आणि हॉलंड बेटांवर सर्वात शेवटी धडकतो. तर, सवाई बेटाजवळील समोआ आणि क्रिसमस बेट हे आस्ट्रेलियापासून काही अंतरावर असल्यामुळे तेथील लोक एकूण २५ तास नववर्षाचा जल्लोष करतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@