बुमराहची मोठी झेप तर भारत आणि कोहली अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : आयसीसीने नुकतीच आपली जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजीत भारताचा कर्णधार विराट कोहली तर, संघामध्ये भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. गोलंदाजीत कांगारूंविरूद्ध दमदार कामगिरी करणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वर्षभरातच ८५व्या स्थानावरून १६ वे स्थान पटकावले आहे. गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा पाचव्या स्थानावरून सहाव्या तर, रविचंद्रन आश्विन सातव्या स्थानावरुन आठव्या स्थानी घसरला आहे.

 

याशिवाय गोलंदाजीत दक्षिण आफ्रीकेचा कगिसो रबाडा हा अव्वल आहे, तर अष्टपैलूच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसनने पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे. सध्या चालू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीत शानदार कामगिरी करणाऱ्या पॅट कमिन्सने मोठी झेप घेत तिसरे स्थान मिळवले आहे. तर, दुसऱ्या स्थानावर इंग्लंडच्या महान जेम्स अँडरसन आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानी आला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ६ तर, दुसऱ्या डावात ३ गडी गारद केले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@