प्रत्येक घोटाळ्यात एकाच कुटुंबाचे नाव कसे? : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : “प्रत्येक घोटाळ्याप्रकरणी एकाच कुटुंबाचे नाव कसे येते?” असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सोमवारी मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ख्रिश्चियन मिशेल हा ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्त्वाचा माणूस आहे. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याचा थेट लाभ हा काँग्रेस पक्षाला झाला आहे. ईडीने ही गोष्ट न्यायालयासमोर सांगितली. त्यामुळे आता गांधी कुटंबियांनी आणि काँग्रेस पक्षाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 

या पत्रकार परिषदेच्यावेळी भाजप नेते माधव भंडारी, गिरिश महाजन आणि केशव उपाध्ये हेदेखील उपस्थित होते. इटालिअन न्यायालयाने ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी जे निर्णय दिले आहेत. त्यामध्ये चार वेळा सोनिया गांधी यांचे नाव आले आहे. हे पुरावे आता समोर आले आहेत. त्यावर काँग्रेसने उत्तर द्यायला हवे. ख्रिश्चियन मिशेल याला ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून ईडी त्याची कसून चौकशी करत आहे. या चौकशी दरम्यान तो माहिती देत आहे.

 

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर प्रकरणी ख्रिश्चियन मिशेल याने आपल्या एजन्सीसमोर जे खुलासे केले होते, तसेच न्यायालयाला त्याने याप्रकरणी जी माहिती दिली आहे. त्यामध्ये सोनिया गांधी यांचे नाव आले आहे. यामध्ये इटालियन लेडी त्यांचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो. असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून याप्रकरणी गांधी कुटुंबाचा समावेश असल्याचे स्पष्ट आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

या हेलिकॉप्टर घोटाळ्यात आतापर्यंत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे एचएएलचे नाव घेत होते. याप्रकरणी एचएएलचे नाव होते. मात्र त्याला दुय्यम स्थान देण्यात आले होते. ही बाब समोर आली आहे. तसेच दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ख्रिश्चियन मिशेल याने त्याच्या वकिलांना एक चिठ्ठी दिली होती. सोनिया गांधी यांच्या संदर्भात चौकशी दरम्यान कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? त्यांची उत्तरे कशी द्यायची? हे त्या चिठ्ठीत त्याने विचारले होते. सोनिया गांधी जर याप्रकरणी सहभागी नसतील तर मिशेलने असे का केले असावे? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
@@AUTHORINFO_V1@@