तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
 
नाशिक : तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील ७ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी देशभरात हे प्रकरण गाजले होते. नाशिक जिल्हा न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी निकाल दिला. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा न्यायाधीश पी.आर देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु होती. तेलगी स्टॅम्प घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू झाला आहे.
 

तेलगी स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी ४९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. ३२ हजार कोटींहून जास्त रक्कमेचा हा घोटाळा आहे. या प्रकरणातील इतर आरोपी हे रेल्वे सुरक्षा दलातील अधिकारी आमि कर्मचारी आहेत. परंतु याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोणताही भक्कम पुरावा नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तेलगी स्टॅम्प घोटाळा प्रकरणाची २००३ पासून सुनावणी सुरु होती. सीबीआय याप्रकरणी तपास करत होते. सोमवारी नाशिक येथील विशेष न्यायालयाकडून याप्रकरणी निकाल देण्यात आला.

 

अब्दुल करीम तेलगी हा बेळगावमधील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवासी होता. तेलगीने केलेला कोट्यावधी रुपयांचा बनावट मुद्रांक घोटाळा समोर आल्यानंतर देशात एकच खळबळ माजली होती. तेलगी आणि त्याच्या भावांनी मिळून नाशिक येथील प्रिंटींग प्रेसमधील जुनी मशीनरी आणली होती. त्याद्वारे त्यांनी बनावट मुद्रांक व्यवसाय उभारला होता. तेलगीच्या या व्यवसायाला भारताचे शेजारील देश पाकिस्तान आणि बांगलादेश यांमधून छुपे पाठबळ होते. अब्दुल करीम तेलगी याने बेळगावातील खानापूरसह मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणी बनावट मुद्रांकांची विक्री करून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता गोळा केला होती.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@