मुंबईत ३ कोटी ५० हजारांचे अमली पदार्थ जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |



मुंबई - नवीन वर्षाच्या जल्लोषाला जग सरसावले असताना मुंबईतील आंबोली पोलिसांनी मोठी कारवाई सोमवारी केली. सुमारे ३ कोटी ५० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ (इफिड्रीन) आंबोली पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे. मोहमद इस्माईल गुलाम हुसेन(४१) आणि दयानंद माणिक मुद्दाणार (३२) अशी आरोपींची नावे आहेत.

 

अमली पदार्थाच्या तस्करीत डिसेंबर महिन्यात होणारी वाढ लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईत साजऱ्या होणाऱ्या पार्टीसाठी हैद्राबादहून ३ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचे इफिड्रीन नावाचे अमली पदार्थ आणणाऱ्या दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

 

एन्काऊंटर फेम पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या टीमने कारवाई केली. आंबोली परिसरात अग्रवाल इस्टेट परिसरात ३० डिसेंबरच्या पहाटे मोहमद आणि दयानंद या दोघांना संशयास्पदरित्या फिरताना पाहिले असता त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून २० किलो ३४८ ग्राम इफिड्रीन नावाचे अमली पदार्थ आढळून आले. या संदर्भात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@