पेमेंट सर्व्हिस देणाऱ्या कंपनीमध्ये 'ट्रू कॉलर'ची भर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |



मुंबई : मोबाईल नंबर कोणाच्या नावाचा आहे हे ओळखण्यासाठी भारतात ट्रू कॉलर या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच ट्रू कॉलर अॅपच्या वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी असून या अॅपमध्ये पेमेंटचा ऑप्शन देण्यात आला आहे. नवीन ऑप्शन दिल्यानंतर कंपनीने मार्च २०१९ पर्यंत ट्रू कॉलर पे चे २.५ कोटी युजर्स असतील, असा दावा केला आहे.


सध्या भारतात डिजिटल पेमेंटचा सर्वात जास्त वापर होत आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या ग्राहकांना पेमेंटचा ऑप्शन दिल्याचे ट्रू कॉलर पे चे उपाध्यक्ष सोनी जॉय यांनी सांगितले. आम्ही ट्रू कॉलर पे लाँच केल्यापासून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अॅपमध्ये जास्त फीचर देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. दरम्यान, इतर पेमेंट सर्व्हिस देणाऱ्या अॅप्सना ट्रू कॉलर पे जोरदार टक्कर देणार असल्याचे दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@