राणीचे बांबरुडला गावठी दारू भट्टीवर पोलिसांची धाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

35 हजाराची दारू कारवाईत नष्ट


पाचोरा : 
 
तालुक्यातील राणीचे बांबरुड शिवारात चिपट्टबल्ली नाल्याच्या काठावर गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड टाकून 35 हजार रुपये किंमतीचे गुळमिश्रित रसायनसह गावठी दारू पोलिसांनी शुक्रवारी कारवाई करीत नष्ट केली.
 
उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉ. प्रताप पाटील, पोलीस नाईक श्रीकांत गायकवाड, पोलीस कॉ.अमृत पाटील, प्रकाश शिवदास पाटील, पोलीस कॉ.विजय पाटील, किशोर पाटील, नरेंद्र शिंदे यांनी धाड टाकून 35ह जार रुपये किमतीचे गुलमिश्रित कच्चे रसायन, 8 प्लास्टिकचे ड्रम त्यात 1600 लिटर गुळ मोह मिश्रित कच्चे रसायन,20 लिटर गावठी दारू ताब्यात घेऊन जागेवर नष्ट केले.
संशयित आरोपी रामचंद्र वाघविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@