आज बहिणाबाईंचा स्मृतिदिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

चौधरीवाड्यात बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजन


जळगाव : 
 
खान्देश कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची 67 वी पुण्यतिथी सोमवार, 3 रोजी सकाळी 10 वा. बहिणाई स्मृती संग्रहालय, चौधरीवाडा, जुने जळगाव येथे साजरी होत आहे.
 
यानिमित्त बहिणाईंना अभिवादन करण्यासाठी बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे कार्यक्रम होणार आहे. विश्वस्त ज्योती जैन आणि साहित्यिक चंद्रकांत भंडारी प्रमुख पाहुणे असतील. साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
 
जळगावपासून सहा किलोमीटरवरील असोदा येथे बहिणाबाईंचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी बहिणाबाई जुन्या जळगावच्या चौधरीवाड्यात लग्न होऊन आल्या. तब्बल 58 वर्षे त्यांनी या वाड्यात वास्तव्य केले.
 
जुन्या जळगावातील या चौधरी वाड्यात 2007 मध्ये जैन इरिगेशनने पुढाकार घेऊन बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट स्थापन केला. याव्दारे बहिणाबाईंच्या स्मृती जपल्या तर गेल्या आहेच परंतु या वाड्याचे जतनही केले गेले आहे.
 
 
वाड्याबरोबरच बहिणाबाईंचे साहित्य नव्या पिढीसमोर यावे म्हणून या ट्रस्टच्या माध्यमातून प्रामुख्याने बहिणाबाईंचा स्मृतिदिवस व जन्मदिवस (24 ऑगस्ट) साजरा केला जातो.
 
चंद्रकांत भंडारी यांनी मुंबईच्या सरस्वती हायस्कूलमध्ये 21 वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले. गेल्या 10 वर्षापासून ते केसीई सोसायटीत शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक आहेत.
 
कार्यक्रमाला परिसरातून दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो. तो आताही अपेक्षित आहे.
@@AUTHORINFO_V1@@