व्हॉट्सअॅपने दिली वर्तमानपत्रात जाहिरात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |



 
 
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवरील फेक मॅसेजमुळे अफवा पसरून अनेकांचे जीव गेले आहेत. मॉब लिंचिगच्या अनेक घटना घडल्या आहेत. व्हॉट्सअॅपवरून अफवा पसरवू नयेत. अशी जनजागृती करणारी जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात आली आहे. पोस्ट फेक आहे की नाही हे कसे ओळखायचे याची माहिती या जाहिरातीत देण्यात आली आहे. त्याचबरोबर आनंद पसरवा, अफवा नाही. असा संदेशही या जाहिरातीत देण्यात आला आहे.
 

भारतात व्हॉट्सअॅपचे एकूण २० कोटी यूजर्स आहेत. मॅसेज पोस्ट करताना त्याची सत्यता न पडताळता तो व्हायरल केला जातो. व्हॉट्सअॅपवरील फेकन्यूजमुळे जातीयवाद वाद वाढून काही ठिकाणी दंगली घडल्या आहेत. गोवर-रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येते, अशी अफवा व्हॉट्सअॅपवरून पसरविण्यात आली होती. अशा फेक पोस्टला आळा घालता यावा यासाठी वर्तमानपत्रात जाहीरात देण्याचे पाऊल व्हॉट्सअॅपला उचलावे लागले. फॉरवर्ड केलेला मॅसेज ओळखता यावा यासाठी व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी एक नवे फीचर लाँच केले होते.

 

 
 

या जाहिरातीद्वारे यूजर्सना व्हॉट्सअॅपवरील फेक बातम्या ओळखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपवरील फेक बातम्या ओळखण्यासाठी पोस्टवरील उजव्या बाजूला एक चिन्ह देण्यात आले आहे. हे चिन्ह जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास यूजर्सना सांगण्यात आले आहे. हे चिन्ह ओळखल्यास बातमी खरी आहे की खोटी हे स्पष्ट होईल. व्हॉट्सअॅपवरील एखाद्या मॅसेजचा मूळ स्त्रोत माहिती नसतो. काही गोष्टींचा पुरावा नसतो. काही भावना भडकवणाऱ्या फॉरवर्डेड मॅसेजमुळे यूजर्सना राग येतो. एवढेच नव्हे तर फोटो, व्हिडिओ, ऑडिओ क्लीप एडिट करून यूजर्सची दिशाभूल करण्यात येते. असे या जाहिरातीत म्हटले आहे.

 

माहितीचे इतर स्त्रोतही तपासा. मॅसेजमध्ये आलेली बातमी खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी ऑनलाईन सर्च करा. बातम्यांच्या वेबसाईट्सवरून त्याची खातरजमा करून घ्या. तसेच या जाहिरातीत अफवांना रोखण्यासाठी लोकांनी मदत करावी. असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही फेक बातमी केवळ तुमच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले म्हणून उगाच शेअर करू नका. असेही या जाहिरातीत सांगण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@