पैसा अन् मुलं गावातच राहिल्यास गावे समृद्ध होतील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

पाचोर्‍यात सहकार मेळाव्यात ना. सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन


पाचोरा : 
 
काम नाही म्हणून मुलं शहरात जातात. ते पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन काम करतात. त्यांची गाव सोडून जाण्याची इच्छा नसते... प्रत्येक मुलाकडे कौशल्य आहे.
 
त्यांच्याशी जुळवून घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या म्हणजे गावातील पैसे गावात आणि गावातील मुलं गावात राहिल्यास खर्‍या अर्थाने सहकारच्या माध्यमातून ही गावे समृद्ध होतील, सारे सुखी होतील..., असे प्रतिपादन सहकार पणन मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी केले.
 
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा - भडगाव तर्फे व अमोल शिंदे यांच्या सहयोगाने शनिवार कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथील प्रांगणात सहकार मेळाव्यात ना. देशमुख बोलत होते.
 
 
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ना. सुभाष देशमुख यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.
सुभाष देशमुख व गिरीश महाजन यांच्या हस्ते काटा पूजन झाले.
 
 
यावेळी मक्याचा हमी भाव 1750 रुपये जाहीर करण्यात आला. पाचोरा, भडगाव तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या सहकारी संस्था पदाधिकार्‍यांचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाला.
 
 
सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले आभार उपसभापती आणि ‘नार-पार नदीजोड प्रकल्प’ चे पुरस्कर्ते अ‍ॅड.विश्वासराव भोसले यांनी मानले.
...यांची होती उपस्थिती
 
भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ,खा. रक्षाताई खडसे व अटल महापणन अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर गणेश शिंदे, सभापती सतीश शिंदे, उपसभापती अ‍ॅड. विश्वासराव भोसले, अमोल शिंदे, सदाशिव पाटील, पाचोरा प.स.चे सभापती बन्सीलाल पाटील जि.प.सदस्य मधुकर काटे, जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब देशमुख, जिल्हा उपनिबंधक एम. यू राठोड, सहा. निबंधक पी. एस. पाटोळे, विवेक जगताप, माजी पं. स. सभापती सुभाष पाटील, भडगावचे भाजपा तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, शहराध्यक्ष नंदू सोमवंशी (पाचोरा) , शैलेंद्र पाटील (भडगाव), युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल नाना पाटील, वसंत गायकवाड, पं. स. सदस्य अनिता पाटील, रत्नप्रभा पाटील, अलकाताई पाटील, अनिता चौधरी आदी व्यासपीठावर होते.
@@AUTHORINFO_V1@@