व्यापार युद्धाला अल्पविराम, शेअर बाजार सावरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

मुंबई : अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार युद्धाला काही काळ अल्पविराम मिळाल्यामुळे सोमवारी शेअर बाजाराने उसळी घेतली. सेन्सेक्स दोनशे अंकांची वाढ झाली मात्र, अखेरच्या सत्रापर्यंत तो ४६.७० अंशांच्या वाढीसह ३६ हजार २४१ च्या स्तरावर बंद झाला. त्यातच निफ्टी केवल सात अंशांच्या मजबूतीसह १० हजार ८८४च्या स्तरावर बंद झाला. मेटल आणि एफएमसीजी शेअरमध्ये खरेदी झाल्यामुळे बाजार सावरला.

 

अस्थिर बाजारातही निफ्टी मेटलमध्ये २.४३ टक्के आणि निफ्टी एफएमसीजी ०.५८ टक्के वाढ झाली. निफ्टी फार्मामध्ये सर्वात जास्त २.०४ टक्के वाढ नोंदवण्यात आली. सन फार्माचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय अधिकारी दिलीप सांघवी यांच्यावर धर्मेश दोशी यांनी बुडीत कर्जांचा आरोप लावला. हे वृत्त बाजारात पसरल्यानंतर सन फार्माचा शेअर १० टक्क्यांनी घसरला. दिवसअखेर ३७ अंशांनी घसरुन तो ४५५.४० रुपयांवर बंद झाला.

 

निफ्टीच्या मंचावर इंडियाबुल्स फायनान्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. दिवसअखेर तो ७१.४० अंशांनी वाढून ७८७ रुपयांवर पोहोचला. याशिवाय येस बॅंक ४.८३ टक्के, हिंदूस्थान युनिलीवर ४ टक्के, गेल इंडिया ३.६७ टक्के, वेदांता ३.६३ टक्के वधारले. ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या बैठकीनंतर सकारात्मक निर्णयामुले आशियाई बाजाराही सावरले. चीनचा शांघाई कंपोझिट २.५५ टक्क्यांनी तर हॉंगकॉंगचा हॅंगसॅंग, जपानचा निक्की, साऊश कोरियाचा कोस्पी आदी निर्देशांकही १ ते २.५ टक्क्यांनी वधारले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@