कतार 'ओपेक'मधून बाहेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |
 

कतार : सर्वात मोठा नैसर्गिक वायू निर्यातदार असलेला देश म्हणून ओळख असलेल्या कतारने पेट्रोलियम निर्यातदार संघटनेतून (ओपेक) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१९पासून कतार संघटनेमधून बाहेर पडणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. कतारचे उर्जामंत्री अल-काबी यांनी ही घोषणा केली आहे. एका संमेलनामध्ये ते बोलत होते.

 

ते म्हणाले, आम्ही यापुढे कच्च्या तेलाचे उत्पादन सुरूच ठेवू मात्र, आता नैसर्गिक वायू उत्पादनांवर लक्ष्य केंद्रीत करणार आहोत. नैसर्गिक वायूची वाढती मागणी लक्षात घेता आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. आम्ही परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलात पुढे काही संधी आत्तातरी दिसत नसून आम्हाला नैसर्गिक वायू उत्पादनांवर लक्ष्य केंद्रीत करायचे आहे.

 

१९६१पासून ओपेकमध्ये कतार सामाविष्ठ झाला होता. ओपेकमध्ये सौदी अरबचा दबादबा होता. दोन्ही देशांमध्ये वर्षांपासून तणाव आहे. त्याचा परिणाम म्हणूनच ही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान ओपेकमध्ये १४ देश सामाविष्ठ आहेत. यामुळे सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धाला ९० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्याचाही परिणाम जागतिक बाजारांवर दिसून आला.

 

कतारमध्ये प्रत्येक दिवशी ६ लाख पिंप तेल उत्पादन घेतेले जाते. अमेरिकेतील तेल उत्पादन प्रतिदिन ११.५ दशलक्ष पिंपांहून अधिक झाले आङेत. येत्या काळात तिथले तेल उत्पादन वाढवले जाऊ शकते. रशियाही दरवर्षी ११.३७ दशलक्ष पिंप उत्पादित करतो. त्यामुळे येत्या काळात नैसर्गिक वायू उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय कतारने घेतला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@