मराठा आरक्षणामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी फायदा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |
 

मुंबई : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा दिल्याचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) राज्यासाठीच्या कोट्यामध्येही मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. सरकारचा निर्णय जारी झाल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी होणार असल्याच माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचानालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे यांनी दिली.

 

वैद्यकीय सरकारी महाविद्यालयांएमबीबीएसबीडीएस या अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेअंतर्गत देश पातळीवर राज्यातील उमेदवारांसाठी राज्याच्या कोट्यांतर्गत ८५ टक्के जागा राखीव आहेत. आतापर्यंत वैद्यकीय किंवा उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात प्रवेश मिळू शकत नव्हता. त्यांच्यापैकी बऱ्याचजणांचा प्रगत वर्गात समावेश झाल्याने गुणवत्तेच्या कोट्यासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या स्पर्धेतही मराठा समाज मागे पडला आहे, अशी खंत व्यक्त केली जाते. आता राज्याच्या ८५ टक्के कोट्यांतर्गत १६ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. देशपातळीवरील उर्वरीत १५ टक्के कोट्यामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा होणार असल्याचेही शिणगारे यांनी सांगितले.

 

१६ टक्के मराठा आरक्षणाचा निर्णय निघताच त्याची अंमलबजावणी होईल, उर्वरीत १५ टक्के देशपातळीवरील कोट्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या जागांमध्ये त्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. तेथे स्पर्धा करावी लागणार आहे राज्यात दरवर्षी दोन लाखाहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशांसाठी अर्ज करतात.

 

सरकारी महाविद्यालयातील जागा –

एमबीबीएस - हजार ११

बीडीएसच्या २६०

 

खागी महाविद्यातील जागा - 

एमबीबीएस - हजार ७२०

बीडीएस - हजार ३५०

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@