दहशतवाद्यांकडून काश्मिरी तरुणांचे हनी ट्रॅपिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |


नवी दिल्ली : दोन आठवड्यापूर्वी १७ नोव्हेंबर रोजी सईद शाजिया नावाच्या एका महिलेला बांदीपोरा येथून अटक करण्यात आली. महिलेचे वय ३० वर्ष असून सोशल मीडियाद्वारे ती तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून हत्यारांची तस्करी करण्याचे काम करवून घेत होती. पाकिस्तानी लष्करी आतंकवादी संघटनांनी काश्मिरातील युवकांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. सुंदर तरुणींना काश्मिरमधल्या युवकांशी मैत्री करण्यास सांगून त्यांच्याकडून या भागात घुसखोरी करण्यासाठी मदत करत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 

सोशल मीडियावर हनी ट्रॅपसाठी कित्येक अकाऊंट वापरली जात आहेत. अटक झालेल्या सईस शाजिया हिचेही अकाऊंट सोशल मीडियावर असून काश्मिर घाटातील बहुसंख्य तरुण तिचे फॉलोअर्स आहेत. ही महिला तरुणांना भेटण्याचे निमंत्रण देऊन विविध प्रलोभने देत असे. केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकाही गेल्या काही महिन्यांपासून शाजियाच्या आयपी एड्रेसवर लक्ष ठेवून होते. तिने सांगितलेल्या गोष्टी केल्यास ती भेटण्यास तयार व्हायची. भेटीसाठी तिने दिलेली सामग्री एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यास सांगत असे.

 

काश्मिरच्या घाटातील अन्य काही तरुणीही हनी ट्रॅपमध्ये सामील असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. तरुणांना भुलवून दहशतवादी संघटनांमध्ये खेचण्याचे प्रकार त्यांच्याकडून केले जात आहेत. काही महिला स्वतःच हत्यारांची तस्करी करत असल्याचे उघडकीस आले आहे. जम्मू काश्मिर पोलीसांनी आसिया जान (२८) या हिला २० ग्रेनेड नेताना अटक केली आहे. तिच्याकडून दारुगोळाही जप्त करण्यात आला होता. दरम्यान शाजियाच्या अटकेपूर्वी पोलीसांनी हंदवाडा येथे राहणाऱ्या अधिकाऱ्यांला पोलीसांनी अटक केली आहे. शाजीयाला या अधिकाऱ्याने पोलीसांच्या कारवाईची माहिती दिली होती. या प्रकरणी अद्याप तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@