अकबरउद्दीन ओवेसीची जीभ घसरली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |


हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रचार करत असताना ओवेसी बंधूंची जीभ घसरली आहे. एमआयएमचे खासदार असदद्दुीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. मात्र, अकबरुद्दीन ओवेसी यांनी प्रक्षोभक भाषण देत थेट पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हैदराबादच्या चारमिनार विधानसभा मतदारसंघात रॅलीला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पंतप्रधानपदाचाही मान राखला नाही. नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. 'चहा वाल्यांनी आम्हाला उकसवू नये, चहा-चहा ओरडता, इतके मारेन की कानातून रक्त बाहेर येईल', असे वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींसंदर्भात केले.

योगी आदित्यनाथ यांनी रविवारी असरुद्दीन ओवेसींवर निशाणा साधला होता. हैदराबादमध्ये भाजपची सत्ता आली तर ओवेसींना निजामाप्रमाणे पळवून लाऊ, अशी बोचरी टिका त्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना हिंदुस्थान मेरे अब्बा का है, मै नही जाऊंगा,’ असे प्रत्युत्तर ओवेसींनी दिले.

  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@