टंचाई परिस्थितीची जबाबदारी शिखर बँकेने स्वीकारावी : चंद्रकांतदादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

महाराष्ट्र राज्य को. ऑप बॅँक मर्या., मुंबईच्या शाखेचे उद्घाटन


 
जळगाव : 
 
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत टंचाईचे संकट दिवसेंदिवस बिकट होत असताना या टंचाईच्या परिस्थितीत राज्यातील कुठल्याही एका जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी व चारा तसेच छावण्या उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी दि. महाराष्ट्र स्टेट को - ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई यांनी स्वीकारावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
 
गोलाणी मार्केट येथे शनिवारी महाराष्ट्र राज्य को -ऑप. बँक मर्यादित, मुंबईच्या 49 व्या जळगाव येथील नवीन शाखेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे ते बोलत होते.
 
अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख होते, तर प्रमुख अतिथी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, समिती सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे, डॉ. अजित देशमुख आदी उपस्थित होते.
 
शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर बँकेविषयी माहिती देतांना म्हणाले की, प्रत्येक शहरात शिखर बँकेची एक शाखा आवश्यक असून शाखा उघडण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
 
बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या धोरणात अमुलाग्र बदल केला आहे. बँकेमार्फत शेतकरी, गरीब माणसाला मोठ्या प्रमाणात मदत करता येईल. राज्य सहकारी बँकेला 400 कोटी रुपयांचा नफा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
 
सुरुवात फीत कापून व दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक समिती सदस्य संजय भेंडे यांनी तर आभार अविनाश मोहगावकर यांनी मानले.
 
मान्यवरांच्या हस्ते डॉ. अब्दुल कुरेशी यांना 10 लाख, डॉ. विनोद चौधरी यांना 30 लाख, तर सैदामणी सहासिनी यांना चारचाकी वाहन खरेदीसाठी 3 लाख रुपये कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले.
ना. सुभाष देशमुख
 
राज्याचे सहाकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, शिखर बँकेने ग्रामीण भागात बँकांचे जाळे पसरवून नाविन्यपूर्ण शाखा कार्यान्वीत कराव्यात.
 
राज्यात सहकार क्षेत्र समृद्ध होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य अधिक समृद्ध होणार नाही. राज्यात 4 लाख बचतगट असून या बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजार पेठ उपलब्ध करुन देवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, साहित्य बनविण्याचे प्रशिक्षण शिखर बँकेच्या सहकार्याने दिले तर फार मोठी उपलब्धी होवू शकते, असेही ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@