व्यावसायिक चेतन महाजनने केली अल्पवधीतच कंपनीची स्थापना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

खान्देशच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा


जळगाव : 
 
येथील तरुण व्यावसायिक चेतन गिरीश महाजन यांनी 21 मार्च, 2018 रोजी व्होरोडॉक्स हेल्थकेअर प्रा.लि. ही कंपनीची स्थापना केली असून अल्प कालावधीतच त्यांच्या कंपनीला गुणवत्तेचा आधारावर थायलंड येथील थीटीरॅटसोनांन फार्मासुटिकल्स कंपनीकडून आठ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (अंदाजे 58 कोटी रुपये) मागणी करण्यात आली आहे. त्यासंबंधीचा करार गेल्या सप्टेंबर महिन्यात करण्यात आला आहे. दरम्यान, चेतन महाजन यांच्या यशाने खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 
 
चेतन महाजन यांनी चेंबूर येथील विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसीमधून औषधनिर्माणशास्त्राची (बी फार्मसी) पदवी घेतली व पुढील शिक्षण विले पार्ले, मुंबई येथील नरसी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (निम्स) येथून एम फार्मसी आणि एमबीए अशा दोन पदव्यूत्तर पदव्या घेऊन संपादित केले.
 
त्यानंतर त्यांनी मॅकलॉईड्स फार्मासुटिकल्स आणि जुबिलंट जेनेरिक्स सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम बघितले. नोकरी करत असताना कामाची चुणूक पाहता कंपन्यांनी मोठी जबाबदारी सोपवली, या कामानिमित्त त्यांनी 12 देशांचा दौरा करुन यशस्वी कार्य करुनही दाखविले.
 
परंतु, पणजोबा हभप कै.सोना आसाराम महाजन यांचा व्यवसायाचा वारसा लक्षात घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संकल्पना मनावर घेऊन व्हेरोडॉकस हेल्थकेअरची स्थापना केली. मुख्य कार्यालय खारघर, नवी मुंबई तर शाखा कार्यालय भवानी पेठ, जळगाव येथे सुरु केले आहे.
विदेशात भारतातील औषधीला मिळणार व्यापारचालना
 
लवकरच कंपनीचा व्याप दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिका खंडात वाढविण्यात येईल, असे चेतन यांनी नमूद केले. व्यवसायाची गरज लक्षात घेवून कंपनीने आयात निर्यातीचा परवानाही मिळवला. विदेशात भारतातील औषधीला नावलौकिक मिळविण्यासोबतच व्यापारचालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
@@AUTHORINFO_V1@@