एड्स जनजागृतीसाठी बसस्थानकावर पोस्टर प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक व नियंत्रण समिती सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्याल जळगाव आणि स्थलांतरित कामकारांसाठी कार्यरत संस्था यांच्यातर्फे नवीन बसस्थाकावर 2 रोजी पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले.
 
दरम्यान, एचआयव्हीसह जीवन जगणार्‍या व्यक्तींसाठी 50 किमी पर्यंतचा प्रवास मोफत करण्यात आले त्याबाबतचे शासनपत्र परिवहन व्यवस्थापक निलिमा बागुल यांना देण्यात आले.
 
प्रवासादरम्यान कशा पध्दतीने प्रवास सुट मिळल याबाबत चर्चा करण्यात आली. लहान मुलांना औषधी घेण्यासाठी एआरटी केंद्रात प्रत्येक महिन्याला येतात त्यांच्याकरिता विशेष बाब म्हणून प्रवासामध्ये आणखी सूट देण्याबाबत चर्चा व विनंती करण्यात आली.
 
 
या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक युवक-युवती व लोकांनी एचआयव्ही एड्सची माहिती पोस्टरद्वारे जाणून घेतली. बसचालक, कंडक्टर यांना लाल फित लावूून शासन पत्राबाबत माहिती देण्यात आली.
 
 
कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, गिरीश गडे, मिलन वाघोदेकर, शुभांगी पाटील, रुपाली दिक्षित, उज्ज्वला पगारे, दिपाली पाटील, प्रतिभा चौधरी, मनिषा वानखेडे, सुवर्णा साळूंखे, छाया मोरे, स्थलांतरित कामकारांसाठी कार्यरत संस्थेचे नवल पाटील, अमोल सुर्यवशी, संजय कापडे, भूषण पाटील, निलेश पाटील, राहूल खैरनार उपस्थित
होते.
@@AUTHORINFO_V1@@