निवडणूकीत घुबडांचा यासाठी वापर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |
 

तेलंगणा : तेलंगणामध्ये निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. याच दरम्यान तेलंगणा पोलिसांनी घुबडांची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीत समोर आलेली माहिती ऐकून पोलीसही थक्क झाले आहेत. तेलंगणाच्या सीमेवर दोन घुबडांची तस्करी करताना या सहा जणांना अटक करण्यात आली होती. तपासात त्यांनी समोरच्याचे गुल लक बॅड लकमध्ये बदलण्यासाठी या घुबडांची तस्करी करत असल्याची कबुली दिली.

 

गेल्या काही दिवसांपासून प्रचारादरम्यान विविध हातखंडे उमेदवार आणि कार्यकत्ये वापरत आहेत. मात्र, हा प्रकार धक्कादायक असल्याचे पोलीसांनी सांगितले. तस्करी केलेल्या घुबडांचा वापर हा समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी केला जाणार होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घुबडांची किंमत तीन ते चार लाख रुपये इतकी ठरली होती. घुबडांमुळे लोकांचे वशीकरण केले जाते, अशी अंधश्रद्धा असल्याने असे प्रकार सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.

 

कर्नाटकमध्ये जादूटोणा करण्यासाठी घुबडांची तस्करी केली जाते. गेल्या काही वर्षांत असे प्रकार वाढत असल्याचे प्राणीमित्र संघटनांचे मत आहे. दरम्यान, अशा अंधश्रद्धेविरोधात जनजागृतीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

 

चुकीच्या समजूती आणि अंधश्रद्धा

घुबडांचा बळी देणे, त्यांच्यापासून जादूटोणा करणे, तस्करी करणे हा कायद्याने गुन्हा असून तसे केल्यास कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@